subhash desai
subhash desai 
छत्रपती संभाजीनगर

लाॅकडाऊनला विरोध करणाऱ्या उद्योगांबाबत काय म्हणाले...सुभाष देसाई

माधव इतबारे

औरंगाबाद ः शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शुक्रवारपासून (ता. १०) लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांनी लॉकडाउनला प्रतिसाद देत घरीच सुरक्षित राहावे. जनतेच्या हिताचा विचार करूनच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योजकांनी सामाजिक भान ठेवून त्यात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता. नऊ) केले. 

शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू केल्यास एमआयडीसीतील उद्योग संकटात येतील, असा इशारा देत उद्योजकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत श्री. देसाई म्हणाले, की लॉकडाउननंतर उद्योगचक्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर राज्यात ६० हजारांहून अधिक उद्योग सुरू झाले. १६ लाख कामगार कामावर परतले. पुन्हा लॉकडाउन लागू केला जात असला तरी फार्मा, एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्या, शेतीवर आधारित उद्योगांना परवानगी आहे. गेल्यावेळी कारखान्यातील कामगारांना दुचाकीवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती; मात्र त्याचा गैरवापर अधिक झाला. त्यामुळे यावेळी तशी परवानगी दिली जाणार नाही, इतर उद्योगही बंद राहतील. उद्योजकांनी सामाजिक भान ठेवले पाहिजे, असे श्री. देसाई म्हणाले. 

पुन्हा अशी वेळ येणार नाही 
कोरोना साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व जनतेमधून करण्यात आली. त्यामुळेच नाइलाजाने लॉकडाउन लागू करावा लागत आहे. पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. 

दोन रुग्णवाहिका सेवेत 
महापालिकेकडे रुग्णवाहिका नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यामुळे दोन रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गुरुवारी (ता. नऊ) रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. महापालिका अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या सभासदांचे एक दिवसाचे वेतन, प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या एक महिन्याच्या वेतनातून तीन रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील दोन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT